नियम १
इंग्रजी वाक्यातील तिसऱ्या स्थानी वाक्यातील Complement (कॉम्प्लिमेंट) म्हणजेच पूरक वापरले जाते.
नियम २
वाक्यातील दुसऱ्या स्थानातील Verb ला जर काय किंवा कोणाला यांपैकी एखादा प्रश्न विचारता येत नसेल, तर ते Verb नेहमी Intransitive म्हणजे अकर्मक आहे असे समजावे.
जेव्हा वाक्यामध्ये Intransitive Verb वापरलेले असते, तेव्हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी या अकर्मक क्रियापदाला जोडून Object न वापरता त्याऐवजी Complement वापरले जाते.
नियम ३
वाक्यातील Intransitive Verb (अकर्मक क्रियापद) ने सूचित होणाऱ्या क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी Complement (पूरक) वापरले जाते.
उदाहरणार्थ –
- He fell sick.
- तो आजारी पडला.
या वाक्यामध्ये fall (फॉल = पडणे) या क्रियापदाला काय किंवा कोणाला यांपैकी कोणताही प्रश्न विचारता येत नाही.
त्यामुळे, या वाक्यामध्ये sick चा उपयोग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी Complement म्हणजे पूरक म्हणून केला आहे.
नियम ६
वाक्यातील Complement हे सामान्यतः पुढीलपैकी एखाद्या स्वरूपाचे असते –
- Noun
- Accusative Case (द्वितीया विभक्ती) चे Pronoun
- Infinitive ने सुरू होणारी Noun Phrase
- Gerund ने सुरू होणारी Noun Phrase
- Adjective
- Adverb
- Preposition ने सुरू होणारी Adverb Phrase