Parts of Speech
इंग्रजी भाषा ज्या Sentence पासून तयार होते, ते प्रत्येक sentence शब्दांपासून तयार होते.
हे शब्द असंख्य असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे व्हावे, म्हणून या शब्दांचे एकूण आठ भाग करण्यात आले आहेत.
या भागांना Parts of Speech (पार्ट्स ऑफ स्पीच) अर्थात भाषेचे भाग असे म्हणतात.
इंग्रजी व्याकरणातील Parts of Speech पुढीलप्रमाणे आहेत.
Noun
Noun (नाऊन) म्हणजे नाम होय.
जगातील सर्व गोष्टींना काही ना काही नावाने आपण ओळखतो. अशा सर्व नावांना Nouns असे म्हणतात.
Read more about NounPronoun
Pronoun (प्रोनाऊन) म्हणजे सर्वनाम होय.
Noun च्या जागी Pronoun चा उपयोग केला जातो. सर्व Pronouns चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या Cases आणि Persons मध्ये केलेले आहे.
Read more about PronounAdjective
Adjective (ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे विशेषण होय.
Adjective चा उपयोग एखाद्या नामाविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी केला जातो.
Read more about AdjectiveVerb
Verb (व्हर्ब) म्हणजे क्रियापद होय.
Verb चा उपयोग वाक्यात घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी केला जातो.
Read more about VerbAdverb
Adverb (ऍड्व्हर्ब) म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय.
वाक्यातील Adverb हे क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेविषयी अधिक माहिती देते.
Read more about AdverbPreposition
Preposition (प्रेपोझिशन्) म्हणजे शब्दयोगी अव्यय होय.
एखाद्या नामाचा किंवा सर्वनामाचा दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी Preposition वापरले जाते.
Read more about PrepositionConjunction
Conjunction (कंजंक्शन्) म्हणजे उभयान्वयी अव्यय होय.
एकापेक्षा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडण्यासाठी Conjunction चा उपयोग केला जातो.
Read more about ConjunctionInterjection
Interjection (इंटरजेक्शन्) म्हणजे केवलप्रयोगी अव्यय होय.
एखादी भावना (emotion) व्यक्त करण्यासाठी Interjection चा उपयोग केला जातो.