Adverb of Frequency


पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय



Adverb of Frequency

Adverb of Frequency (ऍड्व्हर्ब ऑफ फ़्रिक़्वेन्सी) म्हणजे पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय होय.

वाक्यातील घडत असलेली क्रिया अनिश्चितपणे किती वेळा घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Frequency चा उपयोग केला जातो.

“How often” ने सुरू होणारा प्रश्न

वाक्याचा Subject हा वाक्यातील Verb ने सूचित होणारी क्रिया अनिश्चितपणे किती वेळा  करत आहे, हे दर्शविण्यासाठी Adverb of Frequency चा उपयोग केला जातो.

How often (हाऊ ऑफन) ने सुरू होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर जेव्हा अनिश्चित असते, तेव्हा त्याचा संबंध Adverb of Frequency शी असतो.

मात्र, या प्रश्नाचे उत्तर जेव्हा निश्चितपणे देता येते, तेव्हा त्याचा संबंध Adverb of Number शी असतो.

For example (उदाहरणार्थ),
  • तो नेहमी सकाळी दूध पितो.
  • He always drinks milk in the morning.

वरील वाक्यामध्ये always हे Adverb of Frequency वापरलेले आहे.

या वाक्याला How often does he drink milk in the morning? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर always असे येते.

इंग्रजी व्याकरणातील काही Adverbs of Frequency

Adverbs of Frequency मध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Adverb of Frequency
(पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण)
Meaning
(मराठी अर्थ)
sometimes
(समटाईम्स)
कधीकधी
always
(ऑल्वेज)
नेहमी
frequently
(फ्रिक्वेंटली)
वारंवार
often
(ऑफन्)
अनेकदा
never
(नेव्हर)
कधीही...नाही
नियम १
Affrimative Sense चे वाक्य

कोणत्याही Affirmative Sense (ऍफर्मेटिव्ह सेन्स) च्या म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये Adverb of Frequency हे सामान्यतः To च्या Verb ला जोडून त्याच्याआधी वापरलेले असते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • ती अनेकदा तिच्या छोट्या बहिणीसोबत खेळते.
  • She often plays with her little sister.
Example 2
  • ते वारंवार मुंबईला जातात.
  • They frequently go to Mumbai.
Example 3
  • जय कधीही चहा पीत नाही.
  • Jai never drinks tea.

वरील मराठी वाक्य जरी नकारार्थी असले तरी इंग्रजीमध्ये त्याचे रूपांतर करताना not वापरलेले नाही.

त्यामुळे नकार दर्शविताना never चा उपयोग To च्या Verb ला जोडून त्याच्याआधी केलेला आहे.

नियम २
Negative Sense चे वाक्य

कोणत्याही Negative Sense (निगेटिव्ह सेन्स) च्या म्हणजे नकारार्थी वाक्यामध्ये Adverb of Frequency हे सामान्यतः not नंतर वापरलेले असते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • मी नेहमी बाहेर फिरायला जात नाही.
  • I do not always go out for a walk.
Example 2
  • तिला अनेकदा उशीरा होत नाही.
  • She is not often late.
नियम ३
Sometimes चे वाक्यातील स्थान

Sometimes या Adverb of Frequency चा उपयोग मात्र वाक्याच्या आरंभी, वाक्याच्या मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी यांपैकी कुठल्याही ठिकाणी करता येतो.

For example (उदाहरणार्थ),
  • मी कधीकधी आईसोबत बाजारात जातो.
  • Sometimes I go to market with my mother.
  • I sometimes go to market with my mother.
  • I go to market sometimes with my mother.
  • I go to market with my mother sometimes.

This article has been first posted on and last updated on by