Adverb of Number
Adverb of Number (ऍड्व्हर्ब ऑफ नंबर) म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय होय.
वाक्यातील घडत असलेली क्रिया निश्चितपणे किती वेळा घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Number चा उपयोग केला जातो.
“How often” ने सुरू होणारा प्रश्न
वाक्याचा Subject हा वाक्यातील Verb ने सूचित होणारी क्रिया निश्चितपणे किती वेळा करत आहे, हे दर्शविण्यासाठी Adverb of Number चा उपयोग केला जातो.
How often (हाऊ ऑफन) ने सुरू होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर जेव्हा निश्चितपणे देता येते, तेव्हा त्याचा संबंध Adverb of Number शी असतो.
मात्र, या प्रश्नाचे उत्तर जेव्हा अनिश्चित असते, तेव्हा त्याचा संबंध Adverb of Frequency शी असतो.
For example (उदाहरणार्थ),
- ती तिच्या मावशीला महिन्यातून एकदा भेटते.
- She visits her aunt once a month.
वरील वाक्यामध्ये once हे Adverb of Number वापरलेले आहे.
या वाक्याला How often does she visit her aunt? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर once a month असे येते.
इंग्रजी व्याकरणातील काही Adverbs of Number
Adverbs of Number मध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.
Adverb of Number (संख्यावाचक क्रियाविशेषण) |
Meaning (मराठी अर्थ) |
---|---|
once (वन्स) |
एकदा |
twice (ट्वाईस) |
दोनदा |
thrice (थ्राईस) |
तीनदा |
firstly (फर्स्टली) |
पहिले म्हणजे |
secondly (सेकंड्ली) |
दुसरे म्हणजे |
thirdly (थर्डली) |
तिसरे म्हणजे |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- मी इंग्रजीच्या वर्गाला आठवड्यातून दोनदा उपस्थित राहतो.
- I attend the English class twice a week.
Example 2
- त्यांनी तिला तीनदा बोलावलं.
- They called her thrice.
Example 3
- सकाळी व्यायाम करण्याचे खूप फायदे आहेत.
पहिले म्हणजे, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दुसरे म्हणजे, त्यामुळे स्नायू बळकट होतात.
तिसरे म्हणजे, त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. - There are many benefits to do exercise in the morning.
Firstly, it helps with weight loss.
Secondly, it strengthens muscles.
Thirdly, it increases energy levels.