Primary Auxiliary Verb “be”
be (बी) हे एक Primary Auxiliary Verb आहे.
be या क्रियापदाला त्याच्या वाक्यातील उपयोगानुसार To be चे Verb किंवा Primary Auxiliary Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
नियम १
be हे क्रियापद जेव्हा वाक्यातील Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते, तेव्हा त्याला Primary Auxiliary Verb असे म्हणतात.
नियम २
जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये be चा उपयोग Primary Auxiliary Verb म्हणून केलेला असतो, तेव्हा ते वाक्य सामान्यतः Continuous Series किंवा Perfect Series किंवा Perfect Continuous Series यांपैकी एका Tense चे असते किंवा Passive Voice चे असते.
नियम ३
be चा उपयोग Primary Auxiliary Verb म्हणून करताना वाक्यामध्ये पुढीलपैकी एक स्वरूप वापरले जाते.
“be” चे स्वरूप | Type (प्रकार) |
Where to use (कुठे वापरावे) |
---|---|---|
am (ऍम्), is (इज), are (आर) |
Present Tense (वर्तमानकाळ) |
Present Continuous (चालू वर्तमानकाळ) |
was (वॉज), were (वेअर) |
Past Tense (भूतकाळ) |
Past Continuous (चालू भूतकाळ) |
been (बीन) | Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) |
Present Perfect Continuous Past Perfect Continuous |
being (बिइंग) | Present Participle (वर्तमानकालवाचक धातुसाधित) |
Passive Voice (कर्मणी प्रयोग) |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- तो मला माझ्या अभ्यासात मदत करत आहे.
- He is helping me in my studies.
वरील वाक्य Present Continuous Tense चे असून या वाक्यामध्ये is हे Present Tense चे क्रियापद वापरलेले आहे.
is चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to help (मदत करणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.
Example 2
- रमेश वाचनालयात वर्तमानपत्र वाचत होता.
- Ramesh was reading a newspaper in the library.
वरील वाक्य Past Continuous Tense चे असून या वाक्यामध्ये was हे Past Tense चे क्रियापद वापरलेले आहे.
was चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to read (वाचन करणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.
Example 3
- गेले सात दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.
- It has been raining heavily for the last seven days.
वरील वाक्य Present Perfect Continuous Tense चे असून या वाक्यामध्ये been हे Past Participle चे रूप वापरलेले आहे.
has been चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to rain (पाऊस पडणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.
Example 4
- माळ्याकडून साप मारला जात आहे.
- The snake is being killed by the gardener.
वरील वाक्य Passive Voice चे असून या वाक्यामध्ये being हे Present Participle चे रूप वापरलेले आहे.
is being चा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते to kill (मारणे) या Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करीत आहे.