Present Perfect Continuous Tense
Present Perfect Continuous Tense (प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स) म्हणजे चालू पूर्ण वर्तमानकाळ होय.
जेव्हा एखादी क्रिया सतत परंतु दीर्घकाळ चालू असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी Present Perfect Continuous Tense चा उपयोग करतात.
नियम १
इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा have been किंवा has been यांपैकी एखादे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Present Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Present Perfect Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.
नियम २
जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी आहे / आहोत / आहात / आहेत / आहेस यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Present Perfect Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
For example (उदाहरणार्थ),
- गेले सात दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.
- It has been raining heavily for the last seven days.
वरील मराठी वाक्यामध्ये आहे हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील पाऊस पडत हे "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.
तसेच, वाक्याच्या अर्थावरून ही क्रिया दीर्घकाळ चालू आहे, असे समजते.
त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Present Perfect Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
नियम ३
Present Continuous आणि Present Perfect Continuous मधील फरक
Present Continuous Tense आणि Present Perfect Continuous Tense यांमध्ये मराठी वाक्यांची शब्दरचना अगदी सारखी असते.
या दोन्हीही Tenses च्या रचनेमधील Verb ने सूचित होणारी क्रिया सतत चालू असते. परंतु, या दोन्हीही क्रिया जरी सतत चालू असल्या तरी त्यांच्या कालावधीमध्ये फरक असतो.
Present Continuous Tense हे अल्प कालावधीची क्रिया सूचित करते, तर Present Perfect Continuous Tense ची रचना दीर्घ कालावधीची क्रिया सूचित करते.
नियम ४
जेव्हा अशा शब्दरचनेचे मराठी वाक्य रूपांतरित करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे रूपांतर Present Perfect Continuous Tense मध्ये करावे कि Present Continuous Tense मध्ये करावे, हे ठरवण्यासाठी वाक्यातील To च्या Verb ने सूचित होणारी क्रिया आणि सतत चालू असलेल्या क्रियेचा कालावधी लक्षात घ्यावा.
जर हा कालावधी अल्प असेल, तर Present Continuous Tense ची रचना करावी.
जर हा कालावधी दीर्घ असेल, तर Present Perfect Continuous Tense ची रचना करावी.
नियम ५
for आणि since मधील फरक
Present Perfect Continuous Tense च्या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी since किंवा for यांपैकी एक Preposition वापरलेले असते.
या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना पासून या अर्थी since हे Preposition वापरावे.
या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना एकूण कालावधी दर्शविण्यासाठी for हे Preposition वापरावे.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- आई आज सकाळपासून पाहुण्यांसाठी स्वयंपाकघरात न्याहारी बनवत आहे.
- Mother has been making breakfast for the guests in the kitchen since morning.
Example 2
- एक शिकारी सकाळपासून रानात एखाद्या वन्य प्राणी शोधत आहे.
- A hunter has been searching a wild animal in the jungle since morning.
Example 3
- गेली दोन वर्षे ते गरीब कुटुंब या जुन्या घरात राहत आहे.
- The poor family has been living in the old house for the last two years.
Example 4
- मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पक्षी भारतातून दुसऱ्या उबदार देशांकडे स्थलांतर करीत आहेत.
- Birds have been migrating from India to warmer countries since the last week of May.
Example 5
- आमचे शिक्षक वर्गात एक नवा विषय गेले पंधरा दिवस शिकवत आहेत.
- Our teacher has been teaching a new subject in the class for the last fifteen days.
Example 6
- गेले चार महिने शेतकरी चांगल्या पिकाकरीता शेतात खूप काम करीत आहेत.
- Farmers have been working hard in the field for the last four months.