Present Continuous Tense
Present Continuous Tense (प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स) म्हणजे चालू / अपूर्ण वर्तमानकाळ होय.
जेव्हा एखादी क्रिया वर्तमानकाळात सतत परंतु अल्पकाळ चालू असते, तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी Present Continuous Tense चा उपयोग करतात.
नियम १
इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा am किंवा is किंवा are यांपैकी एक Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Present Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Present Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.
नियम २
जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी आहे / आहोत / आहात / आहेत / आहेस यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Present Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
For example (उदाहरणार्थ),
- तो नवीन पुस्तक वाचत आहे.
- He is reading a new book.
वरील मराठी वाक्यामध्ये आहे हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील वाचत हे "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.
त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Present Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- आम्ही भूक भागवण्यासाठी सफरचंद आणि केळी खात आहोत.
- We are eating apples and bananas to satisfy hunger.
Example 2
- तो मला माझ्या अभ्यासात मदत करत आहे.
- He is helping me in my studies.
Example 3
- ती मुलांना एक परीकथा सांगत आहे.
- She is telling a fairy-tale to the children.
Example 4
- ती फाटलेला रुमाल शिवत आहे.
- She is stitching a torn handkerchief.
Example 5
- मीना मैत्रिणींसोबत खेळत आहे.
- Meena is playing with her friends.
Example 6
- सर्व विद्यार्थी उद्यानात जात आहेत.
- All the students are going to the park.