Active Passive Voice आणि Present Perfect Tense चा Active Voice हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Present Perfect Tense चा Passive Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.

Present Perfect Tense मधील Passive Voice – विषय सूची
Present Perfect Tense चा “Passive Voice”

इंग्रजी व्याकरणामधील Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.

ज्या वाक्यात have been किंवा has been यांपैकी एखादे To be चे Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत त्याला जोडून एखादे Past Participle वापरलेले असते, त्या वाक्याला Passive Voice चे Present Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.

Passive Voice ची रचना

इंग्रजी वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object ला कधीही दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करता येत नाही.

मात्र, जेव्हा इंग्रजी वाक्यातील Object वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेले असते आणि अशा वाक्याचा Subject हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेला असतो, तेव्हा त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.

जेव्हा Present Continuous Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.

Subject + have been / has been + Past Participle + by + Noun / Pronoun
Passive Voice च्या वाक्यातील doer

Passive Voice च्या रचनेमध्ये वाक्याच्या शेवटी सामान्यतः by हे Preposition आणि त्याला जोडून एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते.

Passive Voice च्या वाक्यातील by + Noun / Pronoun या शब्दसमूहाला doer (डूअर) असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • Breakfast has been made by mother.
  • आईकडून सकाळी न्याहारी बनवली गेली आहे.

वरील वाक्यामध्ये has been या to be च्या verb ला जोडून made हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

वाक्याच्या पहिल्या स्थानी breakfast हे Common Noun वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून mother हे Noun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

Doer विषयी विशेष टीप

Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करण्यासाठी वाक्यातील doer ची आवश्यकता असते. मात्र, कधीकधी वाक्यात doer वापरलेला असतो आणि कधीकधी doer वापरलेला नसतो.

जेव्हा वाक्यामध्ये doer वापरलेला नसतो, त्यावेळी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तो doer गृहीत धरावा लागतो.

Active Voice ची रचना करण्याचे नियम

Present Perfect Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १ (पहिले स्थान)

पहिल्या स्थानी वाक्यातील doer लिहावा. मात्र, by लिहून नये.

Doer म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, doer म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम २ (दुसरे स्थान)

दुसऱ्या स्थानी have किंवा has यांपैकी योग्य ते Auxiliary Verb लिहावे.

Passive Voice च्या वाक्यातील doer लक्षात घेऊन योग्य ते Auxiliary Verb पुढीलप्रमाणे वापरावे.

Doer To be चे Verb
me have
him has
her
it
Singular Number Noun
us have
you
them
Plural Number Noun
नियम ३ (तिसरे स्थान)

तिसऱ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील Past Participle लिहावे.

नियम ४ (चौथेे स्थान)

चौथ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील Subject लिहावा.

Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
नियम ५ (पाचवे स्थान)

पाचव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत. मात्र, been आणि by  लिहू नयेत.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
Passive Voice The art exhibition has been opened for public by the governer.
Active Voice The governer has opened the art exhibition for public.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये has been  या to be च्या verb ला जोडून opened  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून governer  हे Noun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 2
Passive Voice The work has been started.
Active Voice They have started the work.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये has been  या to be च्या verb ला जोडून started  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

या वाक्यामध्ये doer वापरलेला नसल्यामुळे Active Voice ची रचना करताना वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन they हा doer गृहीत धरलेला आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 3
Passive Voice The poem has been forgotten by us.
Active Voice We have forgotten the poem.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये has been  या to be च्या verb ला जोडून forgotten  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून us  हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 4
Passive Voice Her notebook has been given to her friend by her..
Active Voice She has given her notebook to her friend.
Example 5
Passive Voice The whole garden has been swept by Sujay.
Active Voice Sujay has swept the whole garden.
Example 6
Passive Voice More than two hundred gas cylinders have been stored in the shed by the dealer.
Active Voice The dealer has stored more than two hundred gas cylinders in the shed.
Example 7
Passive Voice The construction of this road has been undertaken by the Public Works Department.
Active Voice The Public Works Department has undertaken the construction of this road.
Example 8
Passive Voice The thought of war against the neighbouring countries has been given up by the king.
Active Voice The king has given up the thought of war against the neighbouring countries.

This article has been first posted on and last updated on by