Active Voice - Sentence starting with "It" having infinitive


कर्तरी प्रयोग - "It" ने सुरू होणारे infinitive असलेले वाक्य



“It + Verb + Infinitive” असलेल्या वाक्यामधील Voice समजणे अधिक सोपे होण्यासाठी पुढील विषय आधी समजून घ्यावा –

“It + Verb + Infinitive” असलेल्या वाक्यामधील Voice – विषय सूची
“It + Verb + Infinitive” असलेल्या वाक्यामधील “Voice”

इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय, तर Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.

जेव्हा इंग्रजी वाक्यामध्ये “It + Verb + Infinitive” अशी रचना वापरलेली असते, तेव्हा Active Voice च्या वाक्यामध्ये Subject म्हणून It हे Pronoun वापरलेले असते. तसेच, त्याला जोडून is (इज्), was (वॉज्) किंवा will be (विल् बी) यांपैकी एखादे Auxiliary Verb वापरलेले असते.

तसेच, या To be च्या Verb ला जोडून Transitive (सकर्मक) असलेले Infinitive वापरलेले असते.

वाक्याची रचना

या वाक्याची रचना पुढीलप्रमाणे असते.

It + To be चे Verb + Complement + Infinitive + Object

अशा वाक्यातील Infinitive हे Transitive (सकर्मक) असल्यामुळे त्याला जोडून Object वापरलेले असते.

वाक्याचा Passive Voice करण्यासाठी याच Object ची आवश्यकता असते.

वाक्यातील To be चे Verb

“It + Verb + Infinitive” ची रचना असलेल्या वाक्यातील To be च्या Verb ला जोडून त्याचे Complement म्हणून Singular Number चे एखादे Noun वापरलेले असते.

अशा रचनेतील वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वाक्याच्या काळानुसार पुढीलप्रमाणे एखादे To be चे Verb वापरलेले असते.

वाक्याचा काळ (Tense) To be चे Verb
Present Tense is
Past Tense was
Future Tense will be
Passive Voice ची रचना करण्याचे नियम

“It + Verb + Infinitive” असलेल्या Active Voice मधील वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १ (पहिले स्थान)

पहिल्या स्थानी वाक्यातील It पासून Complement पर्यंतचे वाक्य लिहावे.

नियम २ (दुसरे स्थान)

दुसऱ्या स्थानी for हे Preposition लिहावे.

नियम ३ (तिसरे स्थान)

तिसऱ्या स्थानी वाक्यातील Infinitive चे Object आहे त्याच स्वरूपात लिहावे.

नियम ४ (चौथे स्थान)

चौथ्या स्थानी to be लिहावे.

नियम ५ (पाचवे स्थान)

पाचव्या स्थानी वाक्यातील Infinitive चे Past Participle म्हणजे तिसरे रूप लिहावे.

नियम ६ (सहावे स्थान)

सहाव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active Voice It is time to shut the shop.
Passive Voice It is time for the shop to be shut.
Example 2
Active Voice It was an easy way to achieve success.
Passive Voice It was an easy way for success to be achieved.
Example 3
Active Voice It will be his excuse to avoid the job.
Passive Voice It will be his excuse for the job to be avoided.
Example 4
Active Voice It is an easy method to solve these examples.
Passive Voice It is an easy method for these examples to be solved.
Example 5
Active Voice It was a problem to find out the lost way.
Passive Voice It was a problem for the lost way to be found.

This article has been first posted on and last updated on by