Future Perfect Continuous Tense
Past Perfect Continuous Tense (फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स) म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ होय.
जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात सतत परंतु दीर्घकाळ चालू राहिलेली असेल असे वाटते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी Future Perfect Continuous Tense चा उपयोग करतात.
नियम १
इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा shall have been किंवा will have been यांपैकी एखादे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Present Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Future Perfect Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.
नियम २
जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी असेन / असू / असशील / असाल / असेल / असतील यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Future Perfect Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
For example (उदाहरणार्थ),
- तो दीर्घकाळापासून त्याचा व्यवसाय चालवत असेल.
- He will have been running his business since long.
वरील मराठी वाक्यामध्ये असेल हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील चालवत हे "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.
तसेच, वाक्याच्या अर्थावरून ही क्रिया भविष्यकाळात सतत परंतु दीर्घकाळ चालू असेल, असे समजते.
त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Future Perfect Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
नियम ३
Future Continuous आणि Future Perfect Continuous मधील फरक
Future Continuous Tense आणि Future Perfect Continuous Tense यांमध्ये मराठी वाक्यांची शब्दरचना अगदी सारखी असते.
या दोन्हीही Tenses च्या रचनेमधील Verb ने सूचित होणारी क्रिया सतत चालू असते. परंतु, या दोन्हीही क्रिया जरी सतत चालू असल्या तरी त्यांच्या कालावधीमध्ये फरक असतो.
Future Continuous Tense हे अल्प कालावधीची क्रिया सूचित करते, तर Future Perfect Continuous Tense ची रचना दीर्घ कालावधीची क्रिया सूचित करते.
नियम ४
जेव्हा अशा शब्दरचनेचे मराठी वाक्य रूपांतरित करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे रूपांतर Future Perfect Continuous Tense मध्ये करावे कि Future Continuous Tense मध्ये करावे, हे ठरवण्यासाठी वाक्यातील To च्या Verb ने सूचित होणारी क्रिया आणि सतत चालू असलेल्या क्रियेचा कालावधी लक्षात घ्यावा.
जर हा कालावधी अल्प असेल, तर Future Continuous Tense ची रचना करावी.
जर हा कालावधी दीर्घ असेल, तर Future Perfect Continuous Tense ची रचना करावी.
नियम ५
for आणि since मधील फरक
Future Perfect Continuous Tense च्या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी since किंवा for यांपैकी एक Preposition वापरलेले असते.
या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना पासून या अर्थी since हे Preposition वापरावे.
या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना एकूण कालावधी दर्शविण्यासाठी for हे Preposition वापरावे.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- ते दीर्घकाळ परदेशी राहत असतील.
- They will have been staying abroad for a long time.
Example 2
- सरकार चार वर्षे नवीन रस्त्यांचे बांधकाम करत असेल.
- Government will have been constructing new roads for four years.
Example 3
- राकेश बऱ्याच महिन्यांपासून त्याच्या मळ्यामध्ये भाज्या लावत असेल.
- Rakesh will have been growing vegetables in his garden since many months.