Past Perfect Continuous Tense
Past Perfect Continuous Tense (पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स) म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ होय.
जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सतत परंतु दीर्घकाळ चालू राहिलेली असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी Past Perfect Continuous Tense चा उपयोग करतात.
नियम १
इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा had been हे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Present Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Past Perfect Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.
नियम २
जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी होतो / होता / होती / होतास / होतीस / होतात / होत्या यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Past Perfect Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
For example (उदाहरणार्थ),
- शेतकरी सकाळपासून शेतात काम करत होते.
- Farmers had been working in the field since morning.
वरील मराठी वाक्यामध्ये होते हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील काम करत हे "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.
तसेच, वाक्याच्या अर्थावरून ही क्रिया भूतकाळात सतत परंतु दीर्घकाळ चालू होती, असे समजते.
त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Past Perfect Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.
नियम ३
Past Continuous आणि Past Perfect Continuous मधील फरक
Past Continuous Tense आणि Past Perfect Continuous Tense यांमध्ये मराठी वाक्यांची शब्दरचना अगदी सारखी असते.
या दोन्हीही Tenses च्या रचनेमधील Verb ने सूचित होणारी क्रिया सतत चालू असते. परंतु, या दोन्हीही क्रिया जरी सतत चालू असल्या तरी त्यांच्या कालावधीमध्ये फरक असतो.
Past Continuous Tense हे अल्प कालावधीची क्रिया सूचित करते, तर Past Perfect Continuous Tense ची रचना दीर्घ कालावधीची क्रिया सूचित करते.
नियम ४
जेव्हा अशा शब्दरचनेचे मराठी वाक्य रूपांतरित करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे रूपांतर Past Perfect Continuous Tense मध्ये करावे कि Past Continuous Tense मध्ये करावे, हे ठरवण्यासाठी वाक्यातील To च्या Verb ने सूचित होणारी क्रिया आणि सतत चालू असलेल्या क्रियेचा कालावधी लक्षात घ्यावा.
जर हा कालावधी अल्प असेल, तर Past Continuous Tense ची रचना करावी.
जर हा कालावधी दीर्घ असेल, तर Past Perfect Continuous Tense ची रचना करावी.
नियम ५
for आणि since मधील फरक
Past Perfect Continuous Tense च्या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी since किंवा for यांपैकी एक Preposition वापरलेले असते.
या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना पासून या अर्थी since हे Preposition वापरावे.
या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना एकूण कालावधी दर्शविण्यासाठी for हे Preposition वापरावे.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- गवंडी आमचे जुने घर तीन महिने दुरुस्त करत होते.
- The mason had been repairing our old house for three months.
Example 2
- एकनाथ त्याच्या मळ्यात गेली कित्येक वर्षे भाज्या आणि झाडे लावत होता.
- Eknath had been growing vegetables and trees in his garden-patch for the last many years.
Example 3
- बरेच कामगार या इमारतीमध्ये सहा महिन्यांपासून काम करत होते.
- Many workers had been working in this building since six months.
Example 4
- त्यांचे लग्न झाल्यापासून ते पत्नी नवीन जागेत राहत होते.
- They had been living in the new place since their marriage.
Example 5
- सर्व वाहने बरीच वर्षे जुन्या पुलाचा वापर करीत होते.
- All vehicles had been using the old bridge for many years.