एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही एखाद्या स्थितीमध्ये असल्यामुळे एखादी गोष्ट घडत आहे, अशी रचना करावयाची असते, तेव्हा being (बीईंग्) चा उपयोग केला जातो.
Being हे To be च्या Verb ला ing प्रत्यय जोडून तयार होणारे Present Participle आहे.
Being हे To be च्या Verb चे म्हणजेच am / is / are / was / were यांपैकी एकाचे Present Participle असल्यामुळे त्याचा संबंध नेहमी To be चे Verb असलेल्या वाक्याशी येतो.
या रचनेमध्ये Being चा उपयोग दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी केला जातो.
मात्र तरीही, Being च्या रचनेचे वाक्य हे नेहमी Simple Sentence समजले जाते.
ज्या वाक्याला मुळे हा प्रत्यय जोडलेला असतो, ते वाक्य नेहमी To be च्या Verb चे असते.
या वाक्याला जोडलेले दुसरे वाक्य कोणत्याही Verb किंवा Tense चे असू शकते.
दोन वाक्ये being ने एकत्र जोडण्यासाठी त्या वाक्यांचे Subjects हे Common (समान) आहेत कि Uncommon (असमान) आहेत, हे लक्षात घ्यावे लागते.
Common (समान) असल्यास पहिल्या वाक्याची सुरूवात Being ने करावी आणि त्याला त्याचे Complement जोडावे.
Complement ला जोडून दुसरे वाक्य आहे तसेच लिहावे.
याचाच अर्थ असा की वाक्यांचे Subjects हे Common (समान) असल्यामुळे पहिल्या वाक्याला Subject लिहिण्याची आवश्यकता नसते.
परंतु, जेव्हा Subjects हे Uncommon (असमान) असतात, तेव्हा मात्र पहिल्या वाक्याचा Subject लिहावा आणि त्याला जोडून being वापरावे.
being ला जोडून त्याचे Complement लिहावे आणि त्यानंतर उरलेले दुसरे वाक्य त्याच्या Subject सहित जसेच्या तसे लिहावे.
-
मी आजारी असल्यामुळे आज शाळेत जाणार नाही.
-
मी आजारी आहे. त्यामुळे आज मी शाळेत जाणार नाही.
-
Being sick, I will not go to school today.
-
केदार श्रीमंत असल्यामुळे गौरवने त्याच्याकडे मदत मागितली.
-
केदार श्रीमंत आहे. त्यामुळे गौरवने त्याच्याकडे मदत मागितली.
-
Kedar being rich, Gaurav asked him for help.
-
दीप्ती हुशार असल्यामुळे ती आपल्या मैत्रिणींना अभ्यासात मदत करते.
-
दीप्ती हुशार आहे. त्यामुळे ती आपल्या मैत्रिणींना अभ्यासात मदत करते.
-
Being intelligent, Deepti helps her friends in their studies.
-
हे सभागृह स्वच्छ असल्यामुळे लोकांना इथे सभा घ्यायला आवडते.
-
हे सभागृह स्वच्छ आहे. त्यामुळे लोकांना इथे सभा घ्यायला आवडते.
-
This community hall being clean, people like to hold their meetings here.
-
मनिषा दयाळू असल्यामुळे ती सर्वांना मदत करते.
-
मनिषा दयाळू आहे. त्यामुळे ती सर्वांना मदत करते.
-
Being kind by nature, Manisha helps all.