transitive verb + infinitive या रचनेच्या वाक्यामधील Voice समजणे अधिक सोपे होण्यासाठी पुढील विषय आधी समजून घ्यावा –
transitive verb + infinitive या रचनेच्या वाक्यामधील Voice – विषय सूची
- transitive verb + infinitive या रचनेच्या वाक्यामधील Voice
- transitive verb + infinitive ची रचना
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- नियम ५ - पाचवे स्थान
- नियम ६ - सहावे स्थान
- नियम ७ - सातवे स्थान
- नियम ८ - आठवे स्थान
- नियम ९ - नववे स्थान
- Active to Passive Voice ची उदाहरणे
transitive verb + infinitive या रचनेच्या वाक्यामधील “Voice”
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय, तर Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.
जेव्हा इंग्रजी वाक्यामध्ये transitive verb + infinitive अशी रचना वापरलेली असते, तेव्हा Active Voice च्या वाक्यामध्ये Subject ला जोडून hope (होप्), wish (विश्), desire (डिझायर), propose (प्रपोज), suggest (सजेस्ट), decide (डिसाईड), resolve (रिझॉल्व) अशा प्रकारचे एखादे Transitive (सकर्मक) असलेले To चे Verb वापरलेले असते.
तसेच, या Main Verb ला जोडून एखादे Infinitive वापरलेले असते.
transitive verb + infinitive ची रचना
transitive verb + infinitive या वाक्याची रचना पुढीलप्रमाणे असते.
अशा रचनेच्या वाक्याचा Passive Voice करण्यासाठी या वाक्याचे दोन भाग गृहीत धरावेत —
Infinitive पासूनच्या वाक्याला दुसरा भाग समजावे आणि वाक्याच्या सुरूवातीच्या भागाला पहिला भाग समजावे.
वाक्यातील पहिल्या भागात subject आणि transitive verb वापरलेले असते.
या वाक्याचा Passive Voice करताना हे transitive verb हे कोणत्या Tense चे आहे, हे लक्षात घ्यावे लागते.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
transitive verb + infinitive या रचनेच्या Active Voice मधील वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
पहिल्या स्थानी It हे Pronoun लिहावे.
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी वाक्याच्या पहिल्या भागातील transitive verb चा Tense (काळ) लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे योग्य ते To be चे Verb लिहावे.
Past Perfect Tensehad beenTense | To be चे Verb |
---|---|
Simple Present Tense | is |
Simple Past Tense | was |
Present Continuous Tense | is being |
Past Continuous Tense | was being |
Present Perfect Tense | has been |
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी वाक्यातील पहिल्या भागातील transitive verb चे Past Participle म्हणजे तिसरे रूप लिहावे.
नियम ४ (चौथे स्थान)
चौथ्या स्थानी by हे Preposition लिहावे.
नियम ५ (पाचवे स्थान)
पाचव्या स्थानी वाक्यातील Subject लिहावा.
Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
Nominative Case चे Pronoun | Accusative Case चे Pronoun |
---|---|
I | me |
We | us |
You | you |
He | him |
She | her |
It | it |
They | them |
नियम ६ (सहावे स्थान)
सहाव्या स्थानी that हे Conjunction लिहावे.
नियम ७ (सातवे स्थान)
सातव्या स्थानी वाक्यातील Subject हा Pronoun च्या स्वरूपात लिहावा.
Subject म्हणून जर एखादे Pronoun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर एखादे Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर त्याऐवजी योग्य ते Nominative Case चे Pronoun लिहावे.
नियम ८ (आठवे स्थान)
आठव्या स्थानी वाक्यातील पहिल्या भागातील transitive verb चा tense लक्षात घेऊन will किंवा would यांपैकी योग्य ते Auxiliary Verb पुढीलप्रमाणे लिहावे.
Tense | Auxiliary Verb |
---|---|
Simple Present Tense | will |
Present Continuous Tense | |
Present Perfect Tense | |
Simple Past Tense | would |
Past Continuous Tense | |
Past Perfect Tense |
नियम ९ (नववे स्थान)
नवव्या स्थानी वाक्यातील दुसऱ्या भागातील Infinitive चे to काढून त्यापासूनचे सर्व शब्द जसेच्या तसे लिहावेत.