For example (उदाहरणार्थ),
- मी ते पेन टेबलावर ठेवलेले आहे.
- I have kept the pen on the table.
वरील वाक्यामध्ये pen आणि table या दोन Nouns चा एकमेकांशी असलेला संबंध on या Preposition म्हणजेच शब्दयोगी अव्ययाने व्यक्त होत आहे.
Prepositions ची विभागणी पुढीलप्रमाणे दोन भागांमध्ये केलेली आहे.
Simple Preposition
Simple Preposition (सिम्पल प्रेपोझिशन) म्हणजे साधे शब्दयोगी अव्यय होय.
Simple Preposition हे केवळ एकाच शब्दापासून तयार झालेले असते.
List of Simple Prepositions
Preposition (शब्दयोगी अव्यय) |
Marathi Meaning (मराठी अर्थ) |
---|---|
at | कडे(गतीची दिशा), वाजता(वेळ), वर/पाशी(जागा), कार्यात, स्थितीत, दराने |
by | जवळ/शेजारी, शेजारून/वरून (गतिवाचक), वेळी (कालावधी), ..ने (वाहनाने) |
for | साठी, करीता, बद्दल, ऐवजी |
from | पासून, कडून, वरून, आतून |
in | आत, मध्ये, ..चा भाग(अंश), अवधीच्या आत(वेळ), एखाद्या परिस्थितीत |
like | प्रमाणे, सारखा, सारखी, सारखे, सारख्या |
near | जवळ, पाशी, बाजूला, शेजारी |
of | ..चा (Possession - मालकी दर्शक) |
off | पासून दूर, पासून अलग, बाजूला |
on | वर, दिवशी, नंतर, विषयी, बाजूला, साधनाने |
over | वर, वरून पलीकडे, ..करताना, ..मुळे |
through | मधून, आतून, च्या शेवटपर्यंत |
till | पर्यंत (कालवाचक) |
to | कडे, पर्यंत, अप्रत्यक्ष कर्म दर्शविण्यासाठी |
up | वर (उर्ध्वगामी गतिवाचक) |
with | सह, बरोबर, शेजारी, जवळ, ..ने ("सहाय्या"ने या अर्थाने) |
Compound Preposition
Compound Preposition (कम्पाउंड प्रेपोझिशन) म्हणजे संयुक्त शब्दयोगी अव्यय होय.
Compound Preposition हे दोन किंवा अधिक शब्द एकमेकांना जोडून तयार झालेले असते.
List of Compound Prepositions
Preposition (शब्दयोगी अव्यय) |
Marathi Meaning (मराठी अर्थ) |
---|---|
about | विषयी, संबंधी, बद्दल, सभोवती, सुमारे |
above | वर, वरच्या बाजूला, पलीकडे, पेक्षा अधिक, कक्षेच्या बाहेर असलेला |
across | पलीकडे, एका बाजूने दुसऱ्या बाजूला |
after | नंतर, मागे, मागोमाग, पाठीमागे |
against | विरुद्ध, वर, टेकून, पार्श्वभूमीवर |
along | बाजूने, कडेने, बाजूला, कडेला, शेजारी |
among | मध्ये ("अनेकांमध्ये" या अर्थाने) |
around | सभोवती, आसपास, आजूबाजूला, सुमारे |
before | पूर्वी, अगोदर, समोर, वरच्या दर्जाचा |
behind | मागे, पाठीमागे, आड, कारणीभूत |
below | खाली |
beneath | खाली, ..पेक्षा खालच्या दर्जाने |
beside | शेजारी, जवळ, बाजूला, तुलना केल्यास |
between | मध्ये ("दोहोंमध्ये" या अर्थाने) |
beyond | च्या पलीकडे, आवाक्याबाहेर |
except | खेरीज, शिवाय, व्यतिरिक्त, सोडल्यास |
inside | आत, आतील बाजूस |
into | आतमध्ये ("बाहेरून" आत या अर्थाने) |
outside | बाहेर, बाहेरील बाजूस |
toward | कडे, ..च्या दिशेने, संबंधी, ..च्या हेतूने, जवळ |
under | खाली, पेक्षा कमी, एखाद्या परिस्थितीत |
upon | वर |
within | आत, आतील बाजूस, एखाद्या मर्यादेच्या आत |
without | खेरीज, शिवाय |